मेथी डाळ/methi dal/ मसालेदार मेथी डाळ
मसालेदार मेथी डाळ/
Methi dal
मेथी डाळ प्रोटीन व फायबर युक्त आहे. याला तडका देवून बनवा व रोटी,नान, पराठा तसेच गरम भाताबरोबर सर्व्ह करावे .
सामग्री
तूर डाळ शिजलेली -१कप
टोमॅटो-१
अदरक लसूण पेस्ट-१चमचा
घी-१ चमचा
कांदा-१
हिंग -१/२पिंच
हळदी पावडर-१/२चमचा
लाल मिरची पावडर-२चमचा
मिरची-४
गरम मसाला-२चमचे
धनेपूड-२चमचे
मीठ चवीप्रमाणे
विधी
कुकर मध्ये तूर डाळ मऊ शिजवून घ्यावी
कूकरमधे भिजलेली तूर डाळ व दीड कप पाणी घालून
२शिट्या करुन नंतर बारीक५ मिनिटे गॅसवर ठेवावं लागेल
तडका
कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात मोहरी हिंग.जिरे, कढीपत्ता घालावा व यात बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा परतून यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा त्यात अदरक लसूण पेस्ट घालून लाल तिखट तसेच धनेपूड घालावे , गरम मसाला २चमचे, हळदी पावडर घालून परतावे.नंतर बारीक चिरलेली मेथी घालावी
ती व्यवस्थित परतावी व मऊ शिजलेली डाळ घालावी व उकळी आणावी
Comments
Post a Comment