Posts

Showing posts from December, 2019

मेथी डाळ/methi dal/ मसालेदार मेथी डाळ

Image
                 म सालेदार मेथी डाळ/   Methi dal  मेथी डाळ प्रोटीन व फायबर युक्त आहे. याला तडका देवून बनवा व रोटी,नान, पराठा तसेच गरम भाताबरोबर सर्व्ह करावे .             सामग्री तूर डाळ शिजलेली -१कप टोमॅटो-१ अदरक लसूण पेस्ट-१चमचा घी-१ चमचा कांदा-१ हिंग -१/२पिंच हळदी पावडर-१/२चमचा लाल मिरची पावडर-२चमचा मिरची-४ गरम मसाला-२चमचे धनेपूड-२चमचे मीठ चवीप्रमाणे विधी कुकर मध्ये तूर डाळ मऊ शिजवून घ्यावी कूकरमधे भिजलेली तूर डाळ व दीड कप पाणी घालून २शिट्या करुन नंतर बारीक५ मिनिटे गॅसवर ठेवावं लागेल तडका कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात मोहरी हिंग.जिरे, कढीपत्ता घालावा व यात बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा परतून यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा त्यात अदरक लसूण पेस्ट घालून लाल तिखट तसेच धनेपूड घालावे , गरम मसाला २चमचे, हळदी पावडर घालून परतावे.नंतर बारीक चिरलेली मेथी घालावी ती व्यवस्थित परतावी व मऊ शिजलेली डाळ घालावी व उकळी आणावी